वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे बॅ.बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन हा ‘संस्थापक दिन‘ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी बॅ.खर्डेकर यांचा ६०वा स्मृतिदिन मंगळवार दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता संपन्न होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-नगरवाचनालय-संस्थेतर्फे-2/
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अॅड.नारायण उर्फ शाम गोडकर हे तसेच अध्यक्ष म्हणून प्रा.डी.आर.आरोलकर उपस्थित राहणार आहेत. तरी यावेळी आजी-माजी विद्यार्थी, नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांनी केले आहे.