Kokan: ब्रेक पॅडल तांत्रिक बिघडामुळे आग लागल्याने चालत्या मांडवी एक्सप्रेसच्या मागच्या डब्यातील चाकामधून धुर

0
26
मांडवी एक्सप्रेसच्या मागच्या डब्यातील चाकामधून धुर ,
ब्रेक पॅडल तांत्रिक बिघडा मुळे आग लागल्याने चालत्या मांडवी एक्सप्रेसच्या मागच्या डब्यातील चाकमधून धुर

⭐धूर येऊ लागल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला.

सावंतवाडी: रेल्वेच्या ब्रेक पॅडला आग लागल्यामुळे चालत्या मांडवी एक्सप्रेसच्या मागच्या डब्यातील चाकमधून धुर आला. अचानक धूर येत असल्यामुळे प्रवाशांनी ही कल्पना रेल्वेच्या अधिकार्‍यांना दिली. मात्र अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने आग विझविण्यास यश आले. याला “ब्रेक बायडींग” असे म्हणतात. रेल्वेच्या चाकाला असलेला ब्रेक चिकटून बसल्याने हा प्रकार घडतो, असे रेल्वे अधिकारीने दिले पस्ष्टीकरण.. रेल्वेच्या पाठीमागच्या एका डब्याखालून धूर येऊ लागल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सावंतवाडी स्थानकाच्या मागे मडुरा स्थानक सोडल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर लगेच रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ब्रेकमधील तांत्रिक दोषामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज उपस्थितांनी व्यक्त केला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कातवड-येथील-घराला-शॉर्ट-स/

मडगाव येथून मुंबईच्या दिशेने आज सकाळी निघालेली ‘मांडवी एक्सप्रेस’ मडुरे स्थानकावर पोहोचली. तोपर्यंत सर्वकाही ठिक होते. मात्र, या स्थानकावरून सावंतवाडीच्या दिशेने निघाल्यानंतर ही खळबळजनक घटना घडली. सावंतवाडी स्थानक अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असताना जनरेटर कार, दीव्यांग व गार्डसाठीच्या शेवटच्या डब्याच्या खालून धूर येऊ लागला. यामुळे सावंतवाडी स्थानकावर गाडी आणून थांबवण्यात आली. या डब्यातील रेल्वे कर्मचार्‍यांनी स्थानकावरील अधिकार्‍यांना आगीबाबत माहिती दिली.डब्यातील महिला प्रवाशांनी घाबरून प्लॅटफॉर्मवर धाव घेतली. त्यानंतर अग्निरोधक वापरून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, रेल्वेच्या डब्याला असलेल्या डिस्क ब्रेकमधील बिघाडामुळे त्यातील काही तांत्रिक कारणांमुळे धूर येऊ लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here