Kokan: भडखंब ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच केल जंगी स्वागत

0
91
भडखंब ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच केल जंगी स्वागत
भडखंब ग्रामस्थांनी खासदार विनायक राऊत यांच केल जंगी स्वागत

भडख़ंबा येथील सात कोटीच्या विकास कामांचे भुमिपुजन खासदार विनायक राऊत यांचे हस्ते


प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

भडखंब : दहा वर्षे हे कोकणचे नेतृत्व कोकणच्या विकासासाठी कटीबद्ध झालेल आहे. आजच्या “कोकणी” म्हणुन असलेल्या जीवन प्रणालीचा “भाई” हे श्वास बनलेत. जसा आभाळातील सूर्य कधी शिळा व बासा होणार नाही तसाच कोकणच्या विकासाचा हा युगंधर, मुत्सूदी राजकारणी, बुलंद तोफ आज तर नाहीच पण उद्याही शिळी होणार नाही.

जन्मताच गरुडभरारीच वेड असलेल्या ह्या राजकारणातील योद्ध्याच्या ठायी कोकणाला विकसित व उन्मेषशाली बनविण्याचं बळ ठासुन भरले आहे. याचीच प्रचिती भडख़ंबा येथील सात कोटीच्या विकास कामांचे भुमिपुजन करण्यासाठी आलेल्या राऊतसाहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here