⭐विविध स्पर्धांमध्ये पालकांचा सहभाग
प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
मसुरे/प्रतिनिधी- भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.प्रारंभी महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संतोषी मांजरेकर यांनी केली. प्रशालेच्या शिक्षिका रेश्मा बोरकर, रसिका मेस्त्री यांच्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. प्रशालेच्या विद्यार्थिनींनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सादरीकरण केले. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-देशभरात-caa-कायदा-ल/
पालकांकडून पाककलांचे सादरीकरण करण्यात आले. शेवटी फनी गेम्स मध्ये पालकांनी सहभागी होऊन आनंद लुटला. रत्ना लब्दे, गायत्री प्रभूगावकर, सावली धुरी, शमिका बांदकर, तसेच प्रशालेच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी मनस्वी नाईक,उत्कर्षा बांदकर यांनी सुद्धा पाककलेचे सादरीकरण केले होते. या सर्वांचा गौरव करण्यात आला. तसेच फनी गेम्स मध्ये विजेते झालेले श्रुती वंजारे,सावली धुरी, अदिती मेस्त्री यांचा देखील गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धृती भोगले व सुहानी मापारी या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी केले. विद्यार्थ्यांमधून पार्थ मुळीक यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांमधून रत्ना लब्दे व गायत्री प्रभुगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आभार गौतमी प्रभुगावकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर देऊलकर, तसेच शिक्षक समीर गोसावी, पार्वती कोदे, संतोषी मांजरेकर,संजना प्रभूगावकर,गौतमी प्रभूगावकर , सायली म्हाडगूत, रंजनी सावंत, स्टेला लोबो,स्वरांजली ठाकूर, रसिका मेस्त्री, सविता मेस्त्री, तनुश्री नाबर, रेश्मा बोरकर तसेच प्रशालेचे कर्मचारी वसंत प्रभूगावकर, समीर सावंत,प्रिया पाटकर, करुणा चव्हाण या सर्वांनी मेहनत घेतली.