वेंगुर्ला प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ३० मे रोजी ९ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ३० मे ते ३० जून या कालावधीत राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष जनसंपर्क अभियान होणार आहे. जिल्हा, मंडल, शक्तीकेंद्र व बुथ पातळीवर वेगवेगळे कार्यक्रम होणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-खर्डेकर-महाविद्यालयाची/
या अभियानाची नियोजन सभा अभियानाचे जिल्हा सहसंयोजक प्रसन्ना देसाई व प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. तालुक्यातील २१ही शक्तीकेंद्रांवर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ‘संपर्क ते समर्थन‘ या अंतर्गत तालुक्यातील प्रमुख घटकातील प्रभावशाली व्यक्ती, खेळाडू, कलाकार, उद्योजक, हुतात्मा सैनिक तसेच अन्य कुटुंबांशी संपर्क करण्यासाठी यादी करण्यात आली आहे. तसेच बुद्धिवंतांच्या संमेलनासाठी तालुक्यातील बुद्धिवंतांची यादी बनविण्यात आली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन आदी कार्यक्रमांबाबत चर्चा करुन प्रमुख पदाधिका-यांवर जबाबदारी देण्यात आली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.