Kokan: भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव वेंगुर्ले उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनी साकार

0
76
कविवर्य मंगेश पाडगावकर ,
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनी वेंगुर्ले उभादांडा येथे पुस्तकांचं गाव साकार

सुरेश कौलगेकर

वेंगुर्ले :

वेंगुर्ल्याचा पाऊस.. कसा माया करत यायचा.. सरीने त्यात लाड करत जायचा….

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…

माझे जीवन गाणे…

या कविता आहेत कवी मंगेश पाडगावकर यांच्या अशा अनेक कवितां साहित्य रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत आणि माणसाला ऊर्जा देत आहेत अशा  कविवर्य मंगेश पाडगावकर व अन्य साहित्यिकांच्या ७०० पेक्षा जास्त साहित्यासह भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव वेंगुर्ले उभादांडा येथे कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या जन्मदिनी साकारलय. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ही संकल्पना सत्यात उतरली आहे या दालनामुळे निश्चितच साहित्य रसिकांना वेगळी भेट मिळाली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कुडाळ-तालुक्यात-मुख्यमं/

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता तीनही बाजूने उंच डोंगर सह्याद्रीच्या कुशीतील हा जिल्हा एका बाजूला विस्तीर्ण समुद्र त्यामुळे या जिल्ह्याला पर्यटकांची ओढ असते वेंगुर्ले तालुका हा निसर्गरम्य पांढरीशुभ्र वाळू नारळ पोफळीच्या बागा आंबा काजू फणस असा निसर्ग संपन्नतेने भरलेल्या या तालुक्याला निसर्गाची संपन्नता त्याचबरोबर साहित्यिकांची खाण दिलेली आहे यामध्ये वि स खांडेकर, मधुसूदन कालेलकर चितांमणी खानोलकर, कृष्णाजी केळुसकर मंगेश पाडगावकर यासह लिटिल मास्टर सुनील गावस्कर, कृषिरत्न काकासाहेब चमणकर अशी अनेक नर रत्ने त्यातीलच एक नररत्न म्हणजे पद्मश्री महाराष्ट्र भूषण कविवर्य के मंगेश पाडगावकर

होत. उभादांडा येथे त्यांचे आजोळ होते तेथेच त्यांचा जन्म झाला.उभादाडा येथील वेंगुर्ले शाळा नंबर २ येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले ज्यावेळी वयाच्या ८० व्या वर्षी ते पुन्हा वेंगुर्लेत आले त्यावेळी त्यांनी शाळेतील शालेय जीवनातील गमतीदार किस्से व आपला खोडकर स्वभाव बोलून दाखवल होता. शालेय दप्तरात ते शाळेत शिकलेल्या च्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. आपल्या शाळेला भेट देतानाच त्यांनी अनेक आठवणी मुलांसमोर मांडताना आपला जीवन उलगडला होता माझे जीवन गाणे हा अजरामर असणारा कार्यक्रम वेंगुर्ले येथे सादर झाला होता आज जरी ते आपल्यात नसले तरी शालेय व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी पहिले पुस्तकांचे गाव त्यांच्याच जन्म गावी सुरू केले हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरले आहे.रेडी रेवस सागरी महामार्गावरील ऊभादांडा गाव वेगुर्ला शहराला लागून आहे.अवघ्या चार किलोमीटरवर हे कविताचे गाव आहे.

भारतातील पहिले पुस्तकांचे गाव सागरेश्वर समुद्रकिनारी व सुरुच्या बागेत वसलेले आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर यांना समुद्राचे भलतेच वेळ होते त्यांनी वेंगुर्ल्यावर असलेले प्रेम हे वेंगुर्लचा पाऊस या कवितेतून साहित्य रसिकांना दाखवून दिले. सुरूच्या झाडाच्या प्रत्येक खोडावर मंगेश पाडगावकर यांची कविता ही जणू प्रत्येक साहित्यिकाला गुणगुणांना लावणारी ठरते त्यांच्या मुख्य दालनात प्रवेश करतात वेंगुर्ल्याचा पाऊस कविता दृष्टिक्षेपास येते. दालनात प्रवेश करतात सुमारे सातशे पुस्तकांचा संच साहित्य प्रेमींना पुस्तकात डोकायायला लावतो जालना समोरून दिसणारा समुद्र पांढरी शुभ्र वाळू प्रत्येक साहित्य प्रेमाला गुणगणायला लावते या दालना भिंतींवर पाडगावकरांच्या अनेक कविता चित्रकाराने रेखाटल्यात यामुळे हे पुस्तकांचे गाव याला निश्चितच भेट देणारे ठिकाण ठरत आहे

जेव्हा शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री कवी बनतात तेव्हा..

पेला अर्धा भरला आहै असं सुद्धा म्हणता येत…पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येत….पेला भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं हे तुम्हीच ठरवा… सांगा कसं जगायचं …कणत कणत की गाणं म्हणत हे तुम्हीच ठरवा… अशी कविता गुणगुणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर कवी बनले. 

हे बोल आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे ज्यांनी  पॉझिटिव्ह कसं जगायचं हे जगाला शिकवलं तेच कवी म्हणजे मंगेश पाडगावकर आणि म्हणून भारतातील पहिले पुस्तकाचे गाव हे त्यांच्या जन्म गावी उभादाडा येथे साकारलं जातय असे  उदगार शालेय शिक्षण व राज्यभाषा मत्री दीपक केसरकर यांनी काढले.

भारतातील पहिले कवितांचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील उभादाडां येथे पद्मभूषण व पद्मश्री जेष्ठ कवी कै. मंगेश पाडगावकर यांच्या जन्मगावी समुद्राच्या सानिध्यात सागरेश्वर या ठिकाणी साकारले आहे.

कवितांचे गाव या संकल्पनेत उभादांडा येथे मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यासमवेत इतर साहित्यीकाचे ७०० पेक्षा जास्त साहित्य उपलब्ध केले आहे. कवितांचे गाव जेथे साकारलय ते समुद्रकिनाऱ्यालगत सुरूच्या वनात आहे.येथे येतानाच झाडांवर कविता लावलेल्या आहेत. त्यामुळे या परिसरात पाडगावकरांचे साहित्य झाडापासून घरापर्यंत रेखाटलेले आहे भारतातील पहिले कवितांचे गाव हे एका खाजगी जागेत सध्या शासनाने उभारलेले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे अर्थमत्री असताना शासनाच्या बजेट मध्ये तीनवेळा घोषणा केली सद्या जेथे हे दालन उपलब्ध केले आहे त्याच्यात शेजारी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या जागेत पुस्तकाचे गाव करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले मात्र ते अयशस्वी ठरले आज मात्र या सकललप्रणेस मूर्त स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे एकदा तरी भेट द्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here