सिंधुदुर्ग , २३ मार्च २०२४ : बजाज ग्रुपतर्फे समाजोपयोगी उपक्रमांसाठी पुढील पाच वर्षांत रु.५,००० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ‘बजाज बियाँड’ या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) आणि धर्मादाय कार्यक्रमांसाठी सुरू करण्यात आलेल्या ग्रुपच्या नव्या विभागांतर्गत कौशल्य विकासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यामुळे येत्या काळातील २ कोटींहून अधिक तरुणांचा फायदा होणार आहे आणि भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे उपलब्ध होणाऱ्या रोजगार व उद्योग संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांना सक्षम करण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-पंचायत-समिती-दापोलीचे-मत/
या उपक्रमांवर प्रतिक्रिया देताना बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज म्हणाले, “आमच्या उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील तरुणांच्या सक्षमीकरणामध्ये परिवर्तनात्मक प्रभाव दिसून आला आहे. आज आम्ही ‘बजाज बियाँड’चे अनावरण करत आहोत. भविष्यातील पिढीला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांनी सुसज्ज करण्याचे आमचे मिशन आम्ही या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत.” या पुढाकाराबद्दल बजाज ऑटो लि.चे चेअरमन नीरज बजाज म्हणाले, “बजाजच्या वारशाचे पाइक म्हणून समाजाची परतफेड करण्याच्या जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे.
बजाज समुहाच्या उद्योगांमध्ये आणि त्यांच्या समाजसेवी प्रयत्नांमध्ये पिढ्यानपिढ्या सामाजिक जबाबदारीचे भान रुजलेले आहे. गेल्या फक्त १० वर्षांच्या कालावधीत, बजाज ग्रुपने सीएसआर उपक्रमांसाठी सुमारे रु.४,००० कोटींचे योगदान दिले आहे. या बहुतेक उपक्रमांचा भर कौशल्य व शिक्षण, आरोग्य, उपजीविका, जलसंवर्धन आणि विकासाच्या इतर क्षेत्रांवर होता.
बजाज ग्रुपतर्फे विविध संस्थांच्या माध्यमातून मानवतावादी उपक्रम राबविण्यात येतात. यात जमनालाल बजाज फाउंडेशन, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, कमलनयन बजाज हॉस्पिटल इत्यादी संस्थांचा समावेश आहे. या संस्था समुदायांच्या उन्नतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी अविरतपणे काम करत आहेत. बजाज इंजिनीअरिंग स्कील्स ट्रेनिंग,(BEST),बजाज फिनसर्व्ह लिमिटेडच्या बँकिंग, फायनान्स व इन्श्युरन्स,बजाज जलसंधारण प्रकल्प, ‘हमारा सप्ना’ हा जमनालाल बजाज ट्रस्ट चा उपक्रम असे बजाज ग्रुपचे विविध प्रमुख सीएसआर उपक्रम आहे.