गुहागर- भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता तुला सोडणार नाही, अशा आक्रमक शब्दांत निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले. ते शुक्रवारी गुहागर येथील जाहीर सभेत बोलत होते. या सभेपूर्वी चिपळूणमधून येताना भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या भाषणात भास्कर जाधव यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पंचगंगेच्या-प्रदूषणमु/
भास्कर जाधव यांनी यापुढे सभा घ्याव्यात. ते सभा घेतील, तिकडे मीदेखील सभा घेईन. पण तू राहिलास तर पुढची सभा होईल, असा गर्भित इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. भास्कर जाधव विनाकारण सगळ्या सभांमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करतात. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.