🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार/ वेगुर्ले, दि- ०९:-
वेगुर्ले तालुक्यातील मठ येथील शिक्षणप्रेमी सुनील सुभाष ठाकुर व अन्य शिक्षणप्रेमी यांच्या माध्यमातून मठ, वेतोरे, आडेली येथील शाळांना संगणक भेट देण्यात आले. यात वेतोरे शाळा नं. २, मठ शाळा नं. १, मठ शाळा नं. २, मठ शाळा नं. ३, आडेली खुटवडवाडी आदी शाळांना कॉम्प्युटर संच भेट देण्यात आले. मठ येथील रायसाहेब डॉ. रा. धो. खानोलकर हायस्कूलला लेझीम संच भेट देण्यात आला. तंत्रशिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन शिक्षणप्रेमी सुनील ठाकुर, राहुल पांजरी, भावेश लिंबाचिया, संचिता ठाकुर, राजमणी विश्वकर्मा इत्यादींच्या सहकार्यातून संगणक भेट देण्यात आले. याबद्दल शाळा मुख्याध्यापकांनी सुनील ठाकुर यांचे आभार मानले.https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यातील-13/