Kokan: मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करा;जिल्हा काँग्रेसतर्फे तक्रार वजा अर्ज सादर

0
14
Congress tarfe nivedan
मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करा;जिल्हा काँग्रेसतर्फे तक्रार वजा अर्ज सादर

वेंगुर्ला प्रतिनिधी – काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देणा-या मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे केली आहे. तशा आशयाचा तक्रार वजा विनंती अर्ज वेंगुर्ला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्याकडे दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-केपादेवीचा-वर/

भारतीय जनता पार्टीचे चित्तपूर (कर्नाटक) विधानसभेचे उमेदवार मनिकांत राठोड हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम आहे. कर्नाटकात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका संभवत आहे. त्यामुळे मनिकांत राठोडवर क्रिमिनल प्रोसिजर कोड अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करावा असे अर्जामध्ये नमुद केले आहे. वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे अर्ज सादर करतेवेळी सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, मुंबई शिवडी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आणि कोचरा गावचे सुपुत्र उदय फणसेकर, वेंगुर्ला शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, कोचरा माजी सरपंच सुनिल करलकर, पुरुषोत्तम हंजनकर उपस्थित होते.

आम्ही काही चुकीचे केले तरी त्याला कोणी विरोध करायचा नाही, जो आम्हाला विरोध करेल त्याला संपवून टाकायचे ही भाजपची विचारसरणी देशाच्या लोकशाहीला घात आहे. येणा-या निवडणूकांमधून जनताच याला चोख उत्तर देईल असे बोलताना इर्शाद शेख म्हणाले.

फोटोओळी – मनिकांत राठोडवर गुन्हा दाखल करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here