Kokan: मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का

0
98
मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का
मसुरे देऊळवाड्यात शिवसेनेचा भाजपला धक्का

आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

मालवण– तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आ.वैभव नाईक यांचे समाजकार्य, शिवसेनेशी त्यांची असलेली निष्ठा तसेच सर्वसामान्य जनतेला गेली अनेक वर्षे अपेक्षित असलेला विकास हा आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ मालवण मतदार संघात केलेला आहे. मालवण नगरपालिकेतील अनेक वर्षे प्रलंबित असलेली अनेक कामे हि आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा करून पूर्णत्वास नेलेली आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. देशात व राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी सर्वसामान्य जनता हि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबतच आहे. शिवसेनेचे कार्य व उद्धवजींचे नेतृत्व याच्यावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढतच आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-आयुष्मान-भव-महत्वाकांक/

याप्रसंगी बोलताना आमदार वैभवजी नाईक म्हणाले शिवसेना हा सर्वांना मान सन्मान देणारा पक्ष आहे, आपण जो आज आमच्यावर विश्वास दाखवून प्रवेश करत आहात पक्षात आपणालाही योग्यतो मानसन्मान या पुढील काळात दिला जाईल. पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे काम चालू आहे, आज अनेक आमदार, खासदार, मंत्री व पदाधिकारी शिवसेना सोडून गेले तरी शिवसेनेची ताकद संपलेली नाही उलट शिवसेना वाढतच आहे. अजूनही स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकजन शिवसेना सोडतील परंतु त्याचा शिवसेनेला कोणताही फरक पडणार नाही असे यावेळी सांगितले.

यावेळी मसुरे देऊळवाडा येथील साल्वादिर जुझे लोबो, रेमेत गिरगोल फर्नांडिस, जोसेफ गिरगोल फर्नांडिस, आयवान जोसेफ फर्नांडिस, मार्शेल फर्नांडिस, ग्रासीन फर्नांडिस, क्रिस्तीन फर्नांडिस, फिसलू रेमेत फर्नांडिस, सिसिल फर्नांडिस, सॅलबीटा फर्नांडिस, सिल्वेस्टर फर्नांडिस, पियाद फर्नांडिस, विल्सन लोबो, जॉरन लोबो, फ्रॅडी लोबो, मेरी लोबो, रुमालदिन फर्नांडिस, स्टेला लोबो, आगस्टीन लोबो, हिमिल लोबो, हेरोदीन लोबो, पीटर फर्नांडिस, कैतान लोबो, एमी फर्नांडिस, डेविड फर्नांडिस, वावतीस फर्नांडिस, थोमास फर्नांडिस, जॉकी फर्नांडिस यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

याप्रसंगी शिवसेनेचे मंदार केणी, राहुल सावंत, मंदार ओरोसकर, विभाग प्रमुख राजेश गावकर, सरपंच सुरेखा वायंगणकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, मर्ढे सरपंच संदीप हडकर, वेरळ उपसरपंच दिनेश परब, रेवंडी सरपंच अमोल वस्त, शशांक माने, नरेंद्र सावंत, जीवन कांदळगावकर, दीपक परुळेकर, समिर लब्दे, अमित भोगले, संतोष अमरे, चंदू मुळीक, सुहास पेडणेकर, अशोक मसुरकर, आबा परब, सुरेश मापारी, अदिती मेस्त्री, प्राजक्ता परब, पप्पू परुळेकर, बाबू आंगणे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here