मसुरे- मसुरे कांदळगाव रस्त्यावरती मसुरे मयानेवाडी येथे लगत असलेल्या डोंगराचा काही भाग शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास या मुख्य रस्त्यावरती कोसळल्यामुळे हा रस्ता सकाळी काही काळ वाहतुकीस पूर्णता बंद होता. सुदैवाने या ठिकाणी वस्ती नसल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. याबाबत प्रशासनाने वेळीच उपयोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग, ग्रामपंचायत विभाग, तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यात सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/kokan-ड्रग्ज-व्यापाराविरोधात/
या घटनेची माहिती मिळताच मरडे ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच पिंट्या गावकर यांनी वस्तुस्थितीची ग्रामस्थांसोबत पाहणी केली. तसेच त्वरित जेसीबीच्या साह्याने सदर रस्त्यावर आलेली माती हटविण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने सुद्धा याबाबतची माहिती घेऊन सदर रस्त्यावरची माती दूर करण्यासाठी प्रयत्न केले. मसुरे कांदळगाव हा मार्ग डोंगर भागातून जात असून या मार्गालगतच ठीक ठिकाणी या डोंगराची माती उत्खलन केल्यामुळे या भागाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन उपयोजना करणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्या नजीक तळणी भागामध्ये डोंगर खचल्याची घटना घडली होती..