Kokan: महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे, भाजपा नेते विनोद तावडे साधणार रत्नागिरीतील मान्यवरांशी संवाद

0
68
मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन
मालोंड बेलाची वाडी येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पाच विकासात्मक कामांचे भूमिपूजन

बुधवारी रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजन

रत्नागिरी-
महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे रत्नागिरीतील प्रतिष्ठित मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. येत्या ७ मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. सर्वत्र प्रचाराला वेग आला असून महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवतानाच अब कि बार ४०० ची घोषणा केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-महायुतीचे-उमेदवार-ना-राण/

रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या प्रचाराने मतदार संघात वेग घेतला असून बैठका, प्रचार फेर्यांना उत्फूर्त प्रतिसाद जनता देत आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील प्रतिष्ठित मान्यवरांशी संवाद साधण्यासाठी ना. राणे यांच्यासमवेत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे रत्नागिरीत येत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, लोकसभा सहप्रभारी बाळासाहेब माने यांनी आवाहन केले आहे. बुधवार दि. 24 एप्रिल रोजी सकाळी 9. 30 वा. रत्नागिरी शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालय येथे या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार श्री. विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ

🔹 शिवसेनेची धगधगती तोफ मा.श्री.नितीन बानगुडे पाटील यांची जाहीर सभा

🔸 शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११:०० वा.

🔹 स्थळ : मनोहर मंगल कार्यालय, माणगांव ता. कुडाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here