वेंगुर्ला प्रतिनिधी- सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब यांनी युवक काँग्रेसच्या संघटनावाढीमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सुरक्षित-दिवाळीसाठी-महा/
पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करताना सिद्धेश उर्फ भाई परब यांनी युवक संघटना मजबुतीसाठी विशेष परिश्रम घेतले. तसेच त्यांनी या अगोदर सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्ष म्हणून काम करताना युवक काँग्रेसच्या संघटनावाढीमध्ये सिद्धेश परब यांचे योगदान मोठे आहे. कुडाळ एम.आय.डी.सी. येथे आयोजित केलेल्या जिल्हा राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी जयदीप थोरात व सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्यावतीने सिद्धेश परब यांची युवक प्रदेश सचिव पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष नगरसेवक नितिन बागे, कणकवली युवक काँग्रेस अध्यक्ष अनिकेत दहिबांवकर, देवगड युवक काँग्रेस दीपक पाडवे, वेंगुर्ला तालुका कार्यकारणी सदस्य आनंद गोडकर, कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मंदार शिरसाट व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटोओळी – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल सिद्धेश परब यांचा सत्कार करण्यात आला.