⭐सुरक्षिततेसाठी केलेले गार्डींग वादळी वार्याने लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जिवीतास धोका. ⭐महावितरण हुमरमळा कार्यालयाला कळवूनही पवार करीत आहेत कानाडोळा
कुडाळ- आंदुर्ले चांमुंडेश्वरी मंदिर समोरील ११ kv विद्युत वाहीन्या रस्त्यावरुन गेल्या आहेत आणि सुरक्षिततेसाठी त्याला केलेले गार्डींग हे गुरुवार दिनांक २३ मे २०२४ रोजी आलेल्या वादळी वाऱ्याने तुटुन खाली लोंबत आहे आणि त्याच खालून सुद्धा गावात विद्युत पुरवढा करणार्या वाहीन्या गेलेल्या असल्याने गार्डींग तुटून विद्युत वाहिनींना लागून रस्त्यावर पडल्यास प्रवास करणारे आंदुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रस्त्यावरुन जाणाऱ्या एस टी बस,इतर वाहने यांना या प्रकारा यांमुळे अनर्थ होऊ शकतो.या संबंधी वायरमन यांना ग्रामस्थ तसेच सरपंच , ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळोवेळी सांगून सूद्धा तसेच स्वतः वायरमन त्याच रस्त्याने सात ते आठ वेळा दिवसातून प्रवास करत असुनही त्यावर दुर्लक्ष करत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokanपावसाळी-हंगामामुळे-खोल-स/
यासंबंधी स्वतः सरपंच यांनी हुमरमाळा सेक्शन ऑफीसचे पवार यांना याची पाहाणी करण्यासाठी बोलविले होते.पण त्यांनी सुद्धा येतो म्हणून सांगून अद्याप चार दिवस उलटले तरी या कडे दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे आंदुर्ले ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार एक प्रकारे महावितरण करते आहे…. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असुन लवकरचं महावितरण कुडाळ ऑफीसला भेट देऊन यासमंधी जाब विचारणार आहेत….वादळी वाऱ्याला आठ दिवस उलटून गेले असतानाही अजूनही हे गार्डींग तसेच लोंबत ठेऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याऱ्या डोळे बंद करून त्या खालून प्रवास करणाऱ्या वायरमनचा महावितरणने सत्कार करावा.. तसेच महावितरणने ही समस्या त्वरीत दुर न केल्यास आंदोलनाचा इशारा गावचे सरपंच तेंडोलकर यांनी दिला आहे.