रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधुरक्त मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबीराचे आयोजन.
सुनिता भाईप / ( सावंतवाडी) रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदा व रोटरी क्लब ऑफ बांदा तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं 1 या ठिकाणी ठीक 10.30 वा हे शिबीर सुरू होईल.
यावेळी बांबूळी येथील ब्लड बँक रक्तसंकलन करेल. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन रोटरॅक्ट अध्यक्ष अक्षय मयेकर, रोटरी अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले.