🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली:-
घटस्फोटीत महिलेला लग्नाचे वचन देऊन वेळोवेळी शारिरीक अत्याचार करून गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी येथील सौरभ बाबुराव बर्डे याला अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला.आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-तुळजाभवानी-चरणी-अर्धा-क/
जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत एका घटस्फोटीत महिलेला लग्न करतो असे सांगून तीच्याकडून तीन लाख रुपये एवढी रक्कम वेळोवेळी घेतली. तसेच लग्नाचे वचन देत तीच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केले व तीचे अश्लिल फोटो काढले. ती गरोदर आहे, असे लक्षात आल्यावर गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पडून तीच्या इच्छेविरूद्ध गर्भपात केला. तसेच त्यानंतर लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर संबंधीत महिला विचारणा करण्यास गेली असता फोटो व्हायरल करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहिता कलम ६९, ६४, ८८, ८९, ३१४, ३५२, ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने जामिन मंजूर करताना फिर्यादी व सरकरा पक्षावर दबाव आणू नये, अशाप्रकारचा गुन्हा पुन्हा करू नये, अशा अटी घातल्या आहेत.