दापोली- प्रत्येक मनुष्याचा जन्मापासून ते मृत्युपर्यंत नेहमीच मातीशी संबंध येतो. मानवाच्या प्रत्येक विकासाच्या मुळाशी माती आहे. तशीच ती प्रत्येक पिकाच्या मुळाशीही असणे आवश्यक आहे. मृदा संवर्धन व मृदा जतन ही काळाची गरज आहे. चला, मृदा संवर्धन करुया, मातीशी नाते घट्ट करुया असे भावनिक आवाहन डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी दापोली जवळील चंद्रनगर येथे जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-बांदा-केंद्रशाळेच्या-चा/
दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून जगभरात साजरा होतो. या दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मृदाशास्र व कृषी रसायनशास्त्र विभागाच्या वतीने दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील श्री देवी घाणेकरीन मंदिराच्या प्रांगणात जागतिक मृदा दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मृदापरिक्षण प्रात्यक्षिक, व्याख्यान व शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मृदा व विज्ञान विषयक प्रतिकृती व कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठीच्या व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे, रत्नागिरी जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य मोहन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वैज्ञानिक कलाकृतींचे डाॅ. संजय भावे यांनी कौतुक केले. चंद्रनगर गावच्या सरपंच भाग्यश्री जगदाळे व विस्तार शिक्षण संचालक प्रमोद सावंत यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सिद्धिविनायक साळुंके, जयसिंगराव चव्हाण, हरिष बागूल, मयुरेश गोडसे, अभिषेक पाटील, सुधांशु गोलामडे, तुषार तांडेल, अभिराज खरात, प्रथम साखळकर, समर्थ कावळे, मयुर सुरासे, उदय आरोटे, प्रथमेश सपकाळे, धैर्यशील पाटील, प्रवीणसिंह जाधव, विनायक पिसे, तेजस बायस्कार, संघर्ष तायडे या ‘ रावे ‘च्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.