Kokan: मातोंड सातेरी देवीचा वर्धापनदिन 14 व 15 रोजी

0
79
मातोंड सातेरी देवी
मातोंड सातेरी देवीचा वर्धापनदिन 14 व 15 रोजी

वेंगुर्ला प्रतिनिधी – मातोंड येथील श्री देवी सातेरी परिवार देवतेचा वर्धापनदिन सोहळा 14 व 15 मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

यानिमित्त दि. 14 रोजी  गणपतीपूजन, पुण्याहवाचन, श्री सातेरीकडे लघुविष्णू अनुष्ठान, कुंकूमार्चन, आरती, तीर्थप्रसाद, रात्रौ 8 वा. विश्व नृत्य डान्स अॅकॅडमी सावंताडी यांचा कलाविष्कार, 8.30 वा. एम.के.डान्स अॅकॅडमी सावंतवाडी प्रस्तुत व्हरायटी शो, दि. 15 रोजी सकाळी 8 वा. श्रीसत्यनारायण महापूजा, 10 वा. कुंकूमार्चन, दुपारी 1 वा. महाप्रसाद, रात्रौ 8 वा. नाईक मोचेमाडकर दशावतार नाट¬ मंडळाचा “चैत्र शुद्ध’ हा पौराणिक नाट¬प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे अवाहन समस्त गांवकर मंडळी, देवस्थान कमिटी, श्री देवी सातेरी युवक कला-क्रिडा मंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.  https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-जॅंगो-जेडी-चि/
फोटो – मातोंड सातेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here