⭐ नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अशीघटना घडली असल्याने मालवणवासियांत हळहळ व्याक्त होत आहे –
मालवण/प्रतिनिधी- मालवणमध्ये मोठी दुर्घटना घडली . नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण राज्यभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मालवणमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मालवणमध्ये मासेमारी बोट बुडून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तिघांचे देखील मृतदेह सापडले असून हे सर्व खलाशी आचराचे असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगाराम आडकर असे यातील एका मृताचे नाव आहे. अपघातग्रस्त बोट गंगाराम आडकर यांचीच होती असे म्हटले जात आहे. https://sindhudurgsamachar.in/mzharashtra-मुख्यमंत्री-तीर्थ-दर्श/ –
मिळालेल्या माहितीनुसार, आचरा येथील चार खलाशी मासेमारीसाठी रविवारी रात्री सर्जेकोट समुद्रात गेले होते. समुद्रामध्ये निर्माण झालेल्या धुक्यांमुळे बोट दगडाला आपटली. त्यानंतर ही बोट समुद्रात पलटी झाली आणि बोटीवरील चारही खलाशी समुद्रात बुडाले. यामधील ३ खालाश्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या खलाशांपैकी एक खलाशी पोहत पोहत समुद्रकिनारी पोहचला. त्याने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर समुद्रात बुडालेल्या तिन्ही खलाशांचा शोध घेण्यात आला. या तिन्ही खलाशांचे मृतेदह सापडले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत.