🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारI देवगड, दि- ०५:
मोंड-मळेगाव अनभवणेवाडी येथील आपल्या माहेरी आलेल्या सौ. अंजली रुपेश कडव (२५, मूळ चांदिवडी- देहेन, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचे बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास जामसंडे येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सौ. अंजली ह्या काविळच्या आजाराने त्रस्त होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काविळच्या आजाराने त्रस्त असल्याने सौ. अंजली हया माहेरी आल्या होत्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी जामसंडे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-वृद्ध-कलावंत-व-साहित्यि/