Kokan: मा.आ.वैभव नाईक हे एकटे नसुन कुडाळ मालवण मतदारसंघातील जनता त्यांच्या सोबत आहे – अतुल बंगे!

0
16
मा.आ.वैभव नाईक
मा.आ.वैभव नाईक हे एकटे नसुन कुडाळ मालवण मतदारसंघातील जनता त्यांच्या सोबत आहे - अतुल बंगे!

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कुडाळ (प्रतिनिधी)

मा. आमदार वैभव नाईक यांनी आज पर्यंत स्वतःच्या छातिची ढाल करुन संघर्ष केला. या पुढच्या काळात त्यांना त्रास झाल्यास कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोक रस्त्यावर उतरतील असा इशारा शिवसेनेचे अतुल बंगे यांनी दीला आहे मा. आमदार वैभव नाईक पक्ष प्रमुख ना. उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहीले तसेच कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार म्हणून जनतेसोबत राहीले म्हणून त्यांना किती तरी त्रास भोगावा लागला यावर प्रतिक्रिया श्री बंगे यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वालावल-ग्रामपंचायतीच्य/

श्री बंगे बोलताना पुढे म्हणाले.’ मा आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्ते आणि जनता हा दुवा मानुन काम केले संपत्ती कमवणे हे त्यांचे ध्येय नाही पण जेणे करून त्यांना त्रास दिल्या नंतर ज्यांनी पक्ष प्रवेश केले तसे वैभव नाईक करु शकतात ही जर खुळी समजुत सत्ताधारी पक्षाची असेल तर ती खुळीच समजुत आहे असे सांगून श्री बंगे म्हणाले आज काही कार्यकर्ते पक्षांतर करतात त्यांना खुशाल करुदेत मात्र मा आमदार वैभव नाईक यांना या पुढच्या काळात त्रास झाला तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा श्री बंगे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here