सावंतवाडी– मी माझ्या मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून काम केली आहेत. तरीही काही लोक माझी बदनामी करत आहेत. मी माझ्या मतदार संघातील लोकांना खोटी स्वप्न दाखवली नाहीत तर ती सत्यात उतरवली आहेत.. त्या मुळे मी आजपर्यंत त्यांच्याविरोधात संघर्ष केला आहे यांच्या विरोधात मला लढा द्यायला मला वेळ लागणार नाही. असा इशारा देखील नाव न घेता राजन तेली आणि विशाल परब यांना दिला आहे. काहींना वाटत असेल जनतेला पैशावर विकत घेऊ अस त्यांना वाटत असेल तर ते भ्रमांत आहेत, आशा लोकांना जनता बळी पडणार नसून पॉझिटिव्ह विचारला घेऊन जाणाऱ्या लोकांसोबत जनता पाठीशी उभी राहणार असा विश्वास आहे श्री केसरकर यांनी व्यक्त केला. आज मी एवढी काम केली असताना सगळ्यांनी मला बिनविरोध निवडून द्यायचं सोडून मला विरोधाला विरोध करत राहायचं काम ही मंडळी करत आहेत असा टोला त्यांनी तेली यांना लगावला. https://sindhudurgsamachar.in/kokan-आ-वैभव-नाईकांकडून-भाजपला/ –
त्याच बरोबर काहीजण गावागावात जाऊन माझ्या बदल फेक चुकीची माहीती जरी पसरवत असले तरी मला त्याचा काही फरक पडणार नाही. माझ्याबद्दल फेक माहीती पसरवण्यापेक्षा स्वतःच्या कामाविषयी लोकांना सांगा, माझी जनता अशा वाईट विचारांना कधीच थारा देणार नाही एवढा गाढा ठाम विश्वास मला माझ्या मतदार संघावर आहे.. त्यामुळे मी काळजी करत नाही..चिंतेतही नाही..चिंत्ता त्यांनी करावी अशी जोरदार टीका महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली आहे.
मंत्री केसरकर यांची बबन साळगावकरांवरही जोरदार टिकाअस्त्र नाव न घेता सोडले येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा मी दाखवून देणार आहे.माझ्यामुळे अनेक पदे भूषविणारे लोक आज माझ्यावरच टीका करत आहेत. त्यांनी थोडी तरी माणुसकी बाळगली पाहिजे अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे. दरम्यान माझ्यावर कोणीही कितीही टीका केली तरी येणाऱ्या निवडणुकीत या लोकांना मी त्यांची जागा दाखवुन देणार असल्याचा इशारा देखील यावेळी दिला आहे.