Kokan: मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांची २१ फेब्रुवारी रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक

0
57
election 2024
भाजपच्या फसव्या आश्वासनाला कंटाळून श्रावण येथील कार्यकर्ते स्वगृही परत.

मुंबईस्थित कुडाळ मालवणवासीय चाकरमान्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आ. वैभव नाईक यांचे आवाहन

प्रतिनिधी : पांडुशेठ साठाम

कुडाळ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ मालवण मतदारसंघातील मुंबई येथे वास्तव्यास असलेले चाकरमानी,ग्रामविकास मंडळांचे सदस्य व शिवसैनिक यांची बैठक बुधवार २१ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवन मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मानसीश्वर-जत्रौत्सव-१७-र/

या बैठकीला शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर,जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश पाटील,कुडाळ संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत,महिला विधानसभा संपर्क प्रमुख अपूर्वा प्रभू हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी मुंबई ठाणे,कल्याण, विरार,वसई व इतर भागात वास्तव्यास असलेल्या मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्वीय सहाय्यक अनंत पाटकर मोबा- ९०११९९५५०३ यांच्याशी संपर्क साधावा.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here