छोट्या गाड्यांसाठी तब्बल 90 रुपये टोल कर मोजावा लागणार
मुंबई गोवा महामार्गावरील टोल आजपासून सुरू होणार आहे. हातिवले टोलनाक्यावर सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावरती राजापूर हातिवले येथे टोल वसुली सुरू होणार आहे. सकाळपासून या ठिकाणी टोलवसुली सुरू होणार असून NHAI ने या टोलवसुलीला परवानगी दिली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-भूषण-2022-पुरस्क/
सर्वपक्षीय नेते तसेच स्थानिकांचा विरोध होता. आता टोलवसुली सुरळीत सुरु होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नितीन गडकरी यांनी सांगितले की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करणार असून जानेवारी 2024 मध्ये रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल.
22 डिसेंबर ला स्थानिकांच्या विरोधामुळे टोल वसुली बंद केली होती. आता त्याची पुन्हा सुरुवात होत आहे. छोट्या गाड्यांसाठी तब्बल 90 रुपये मोजावे लागणार आहे. तर छोट्या गाड्यांच्या रिटर्न जर्नी साठी 130 रुपये मोजावे लागणार आहेत.
वाहनाचा प्रकार वनवे जर्नी रिटर्न जर्नी
कार – 90/- 130/-
ट्रक, बस 295/- 445/-
3 एक्सल 325/- 485/-
एलसीवी / एलजिवी 140/- 210/-
ओव्हर साईझ एक्सल 565/- 850/-
HCM, EME 465/- 695/-
वाहनाचा प्रकार स्थानिक वाहन महिना दर
कार 45/- 29.20
ट्रक, बस 150/- 98.80/-
3 एक्सल 160/=- 107.75/-
एलसीवी / एलजिवी 70/- 47.15/-
ओव्हर साईझ एक्सल 285 188.60/-
HCM, EME 230/- 154/90/-