⭐१२ वर्षाच्या मुलासह महिला गंभीर जखमी.. ⭐ पत्रकार आबा खवणेकर,बाबल घाटकर व सिंधुदुर्ग चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे यांनी जखमी झालेल्या मुलाला व महिलेला तातडीने फोर व्हीलर मधून नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात केले दाखल.. ⭐ संतप्त कणकवलीकरांनी अपघातानंतर तब्बल १ तास मुंबई-गोवा महामार्ग रोखला ⭐ कणकवली – हळवल येथील अपघातातील जखमी महिला सोनाली जाधव व तीचा बारा वर्षाचा मुलगा दक्ष या दोघांनाही रात्री उशिरा १ वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबुळी येथे अधिक उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले आहे.
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवली :-
मुंबई – गोवा महामार्गावरील कणकवली येथील गडनदी पुलावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाने जाणवली ते हळवलकडे जाणाऱ्या दुचाकीला उडवले. यात दुचाकीवरील महिला सोनाली जाधव (वय वर्षे २७) व तीचा मुलगा दक्ष जाधव (वय वर्षे १२) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने कणकवली येथील नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु त्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याने रात्री १ च्या सुमारास त्यांना गोवा – बांबुळी येथील रूग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.तर दक्ष जाधव हा मुलगा कणकवली येथील विद्या मंदिर हायस्कूल येथे इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-किर्लोस-चव्हाणवाडी-येथे/
दरम्यान ट्रकचालक मद्यधुंद अवस्थेत असून,दुचाकी फरपटत सुमारे शंभर मीटर अंतरावर हळवल फाट्यावर आणली. हा अपघात गुरुवारी रात्री पाऊणे आठच्या सुमारास मुंबई -गोवा महामार्गावरील विजयभवन नजीक गडनदी पुलावर घडला आहे.या हळवल फाट्यावर वारंवार अपघात होत असून याबाबत उपाययोजना होत नसल्याने संतप्त वाहन-चालक आणि कणकवलीकरांनी तब्बल १ तास महामार्ग रोखून धरला होता.त्यामुळे दोन्ही बाजूने महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
हळवल येथील महिला सोनाली जाधव ही आपल्या दक्ष या १२ वर्षाच्या मुलाला क्लासमधून जाणवली येथून घेऊन हळवल येथे दुचाकीवरून जात होती.विजय भवन नजीक सर्विस रोडवरून ती गडनदी पुलावर जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रक चालकाने पुढे जात असलेल्या कसवण एसटीला घासत दुचाकीला उडवले .त्यात महिला आणि तिचा मुलगा दुचाकीवरून फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. ट्रक चालकाने ट्रक खाली दुचाकी अडकलेली असतानाच ती फरफटत सुमारे शंभर मिटर अंतरावर हळवल फाट्यापर्यंत नेली.समोरील एसटी चालकाला हा प्रकार समजताच त्याने पुढे जाऊन एसटी आडवी लावली.दरम्यान ट्रकच्या या अपघातात दुचाकीवरील महिला व तीचा मुलगा रस्त्यावर पडलेली होती.मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता.तर त्याची आई मदतीची मागणी करत होती.आजु बाजूला लोकांची गर्दी होती. पण कोणीही त्या दोघांनाही मदत करायला पुढे येत नव्हते. साधारण १५ ते २० मिनिटे ती दोघंही गडनदी पुलावर जखमी अवस्थेत रस्त्यावरचं होती.
याच दरम्यान पत्रकार आबा खवणेकर, वेंगुर्ले-किनळणेवाडी येथील बाबल घाटकर व सिंधुदुर्ग चालक असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे हे सर्वजण पालकमंत्री नितेश राणे यांना भेटण्यासाठी कणकवलीत आले होते.मात्र हा अपघात बघितला व ताबडतोब श्री.जांभळे यांच्या फोर व्हीलर एर्टिगा कारने जखमी अवस्थेत असलेल्या महिलेला व मुलाला फोर व्हीलर घेऊन तातडीने उपचारासाठी कणकवलीतील नागवेकर यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान ही बातमी कळताच भाजपचे कणकवली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष समिर नलावडे व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोठया सावंत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच हळवल येथील ग्रामस्थांनी यावेळी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान हळवल फाट्यावर अपघात झाल्याचे समजतात कणकवलीकरांनी धाव घेत मोठी गर्दी केली. अपघात करणाऱ्या ट्रक चालकाला चांगला चोप दिला. घटनास्थळी पोहोचले. मात्र या हळवल फाट्यावर जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत तोपर्यंत महामार्गावरून वाहतूक सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेत तब्बल १ तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.