मुंबई- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निडी गावाजवळ सायंकाळच्या दरम्यान एसटी व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, दोन गंभीर तर अकरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड बाजूकडून पेण बाजूकडे जाणारी महाड बोरीवली एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २४३३ ) ही मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे हद्दीतील निडी गावाजवळ आली असता त्याच दरम्यान पेण बाजूकडून नागोठणे बाजूकडे जाणार्या टेम्पो (क्र. एमएच ०६ बीडब्ल्यू ९५३७ ) चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने एसटी बस व टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-१६-ते-१९-मार्चपर्यंत-विद/
या धडकेत टेम्पो चालक विकास विश्वास सुतार (वय २९ वर्षे, रा. वडवली-महाड) याचा जागेवरच मृत्यू झाला तर टेम्पोतून प्रवास करणारे घणसोली येथील बळीराम कासार (वय ६५ वर्षे) व अंकिता बळीराम कासार (वय ३२ वर्षे) या दोघांच्या डोक्याला, पायाला गंभीर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत तसेच एसटी चालक अमित पवार (वय ३६ वर्षे) याच्यासह १० प्रवासी हे किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना नागोठणे येथील डॉ. सुनील पाटील यांच्या मायालक्ष्मी नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले तसेच गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नेरूळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठविले आहे.
[…] […]