पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l कणकवलीः –
मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेवदेवस्थान समोर अपघात घडला सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली.https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
त्यामुळे मालवण येथून मुंबईच्या दिशेने जाणारी इनोव्हा कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले आणि इनोव्हा दुसऱ्या लेनवर जाऊन अपघातग्रस्त झाली दरम्यान इनोवा मधील प्रवासी बचावले असून अन्य कार मधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले टाटा अल्ट्रास mh 07 ag 7116 या कारमधून मालवण येथील तांडेल कुटुंबीय पंढरपूर दर्शन करून मालवणच्या दिशेने जात होते