वेंगुर्ला प्रतिनिधी- बालशिक्षणाचा अभिनव प्रकल्प असलेल्या वेंगुर्ला येथील मुक्तांगणचा स्नेहमेळावा रविवार दि. ३१ मार्च रोजी सायं. ४.३० वा. श्री परूळेकर दत्त मंदिर, वेंगुर्ला येथे संपन्न होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-कास-शेर्ले-सिमेवर-भिषण-आ/
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थीप्रिय शिक्षक विनय सौदागर हे उपस्थित राहणार आहेत. मुलांचे शिकणे मुक्तांगणच्या माध्यमातून अधिक आनंददायी आणि कसदार व्हावे यासाठी ‘शिक्षण मुलांचे – सहभाग पालकांचा‘ या उपक्रमांतर्गत ‘फलकलेखन प्रकल्प‘ प्रदर्शन व बालगीतांवर आधारीत बालक-पालकांच्या नृत्यनाटिकांचे सादरीकरण होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर यांनी मुक्तांगण परिवारातर्फे केले आहे.
[…] सुनिता भाईप / सावंतवाडी- जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेतील २०२३-२४या शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनपर कलाविष्कार या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रंगतदार बनले.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक बांदा प्रभाग विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर, मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये,केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख संदीप गवस, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर,सरोज नाईक, अनुराधा धामापूरकर,प्रदिप सावंत, शिक्षिका वंदना शितोळे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा संपदा सिध्दये,हेमंत मोर्ये, संत़ोष बांदेकर,राधिका गवस,दिक्षा ठाकूर माता पालक संघ उपाध्यक्ष तन्वी काणेकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुक्तांगणचा-स्नेहमेळाव… […]