वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील मुक्तांगण महिला मंचची २०२४-२५ या कालावधीसाठी नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षपदी माधवी मातोंडकर तर कार्याध्यक्षपदी दिव्या आजगांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष स्वाती बांदेकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नुतन अध्यक्ष माधवी मातोंडकर यांच्याकडे सुपूर्द केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-वेंगुर्ला-येथील-दुय्यम-न/
उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष-माहेश्वरी गवंडे, खजिनदार-रूपा शिरसाट, सचिव-संजना तेंडोलकर, उपक्रम विभाग प्रमुख मंजिरी केळजी, सहल विभाग प्रमुख – निलम रेडकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख साक्षी वेंगुर्लेकर व अनुजा धारगळकर तर सदस्य म्हणून रचना गावडे, हेमा मठकर, स्वाती बांदेकर, रिया केरकर यांचा समावेश आहे. या निवडीवेळी झालेल्या बैठकीत विविध संस्थांना भेटी, शिबिरे, व्याख्याने आदी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुक्तांगणच्या प्रमुख मार्गदर्शक मंगल परूळेकर यांनी दिली.
दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सावित्रीबाईंना अभिवादन म्हणून कविता, सामाजिक योगदान यावर स्वाती बांदेकर व दिव्या आजगांवकर यांनी आपले विचार मांडले.
फोटो – माधवी मातोंडकर, दिव्या आजगांवकर