कुडाळ:-(आबा खवणेकर):-पुर्वी आंदुर्ला गावासाठी एकच पोलीस पाटील होता.आता त्या मध्ये बदल झाल्याने आंदुर्ला व मुणगी असे आता दोन स्वतंत्र महसूल गाव झाल्याने मुणगी महसूल गावाच्या पोलीस पाटील पदी ज्ञानेश्वर तुकाराम तांडेल यांची नियुक्ती झाली आहे.कुडाळ तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार श्री.आढाव यांनी ज्ञानेश्वर तांडेल यांना नियुक्तीपत्र दिले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-r-k-फउडशनचय-वतन-सद/
आंदुर्ला मुणगी भगतवाडी येथील रहिवासी श्री ज्ञानेश्वर तुकाराम तांडेल यांना पहिल्यापासून समाजसेवेची आवड आहे.गोरगरीबांचे जातीचे दाखले असो किंवा अन्य शासकीय योजनेंचा लाभ असो.ज्ञानेश्वर तांडेल हे त्यांचे अर्ज भरून देऊन स्वता ते तहसीलदार कार्यालयात जाऊन कामे करून देत असतात.एखादयाकडे पैसे नसले तरीही स्वता आपल्या खिशातून पैसे देऊन ते मदत करतात.गावात कुठेही काही घडले तरी ते आवर्जून जातीनिशी उपस्थित राहून सहकार्य करत असल्याने गावात आज त्यांचा नावलौकिक पसरलेला आहे.अतिशय हुशार व हसतमुख असा त्यांचा चेहरा आहे. आज ज्ञानेश्वर तांडेल यांची मुणगी महसूल गावासाठी नियुक्ती झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
तसेच आम्ही केळुस गावासाठी बीएसएनएलचा टाॅवर सुरू व्हावा,यासाठी उपोषण छेडले होते. त्यावेळीही ज्ञानेश्वर तांडेल हे आंदुर्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच असताना आपल्या सदस्यांसह गावातील सामाजिक कार्यकर्ते संजय वेंगुर्लेकर व तेंडोली ग्रामपंचायतीचे सरपंच भाऊ पोतकर,सामाजिक कार्यकर्त्या सौ.आरती पाटील यांच्यासह ग्रामस्थांना घेऊन आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन सहकार्य करून आमचे उपोषण यशस्वी केले होते.अशा या आमच्या हाकेला धावणाऱ्या ज्ञानेश्वर तांडेल यांची आज मुणगी महसूल गावाच्या पोलीस पाटील पदी निवड झाली आहे.