Kokan: मुलांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळा – सचिन वालावलकर

0
114
बॅ.खर्डेकर महाविद्यालय,
मुलांनी नोकरीपेक्षा उद्योगाकडे वळा- सचिन वालावलकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- मुलांनी नोकरीकडे न वळता उद्योगाकडे वळले पाहिजे. आपणाला कोणत्या क्षेत्राकडे जायचे आहे, त्याचे मार्गदर्शन घ्या. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर हे सातत्याने मुलांसाठी शैक्षणिक काम करते. त्यासाठी त्यांचे मी ऋण व्यक्त करतो असे प्रतिपादन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-पत्रकारांचे-कौतुक-करावे/

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात विद्यार्थी आयोजित सांस्कृतिक महोत्सव २०२४ युवा स्पंदनमधील दुस­-या दिवशीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर व वेंगुर्ला शहर अध्यक्ष उमेश येरम यच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, बी.के.सी.असोसिएशनचे बाळू खामकर, बेस्ट फिजिक मंगेश गावडे, प्रा.वामन गावडे, सुरेंद्र चव्हाण, प्रा.दिलीप शितोळे, प्रा.डी.बी.राणे, माजी प्राचार्य डॉ.ए.पी.बांदेकर, विद्यार्थी प्रतिनिधी मंडळ सचिव फाल्गुनी नार्वेकर, मंथन देसाई, तन्वी तुळसकर उपस्थित होते.

स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होऊन चांगले अधिकारी व्हा. हिच करिअर घडविण्याची वेळ आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात समाजसेवा करून आनंद मिळवा असे प्रतिपादन उमेश येरम यांनी केले. मला याच महाविद्यालयाचा असल्याचा गर्व असल्याचे मंगेश गावडे यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा.वामन गावडे यांनी, सूत्रसंचालन डॉ.धनश्री पाटील यांनी तर आभार फाल्गुनी नार्वेकर हिने मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here