Kokan: मुले पाळत आहेत धर्मविर बलिदान मास

1
51
Balidan-Maas
मुले पाळत आहेत धर्मविर बलिदान मास

वेंगुर्ला प्रतिनिधी– धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या क्रूर वृत्तीच्या औरंग्याने ४० दिवस यवन यातना देऊन छळ करीत मारले. त्याप्रित्यर्थ फाल्गुन शुद्ध प्रतिप्रदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजेच १० मार्चपासून ८ एप्रिल असा संपूर्ण एक महिना शंभूराजांच्या बलिदानाचे सुतक सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक पाळत आहेत. https://sindhudurgsamachar.in/भा-ज-प-बिड-च्या-उमेदवार-पंक/

यामध्ये म्हाडा वसाहतीमधील समर्थ कोळी, सुयश वाघमारे, श्रावणी गोकाककर, केतक नळेकर, प्रणव नळेकर, समर्थ कोचरेकर, सुयेल जाधव, संजय प्रजापती, ओजस परब, मानस परब, यशराज कोयंडे, प्रज्वल कोयंडे तसेच मठ-कावलेवाडी येथील प्रथमेश नाईक, तेजस नाईक, साहिल परब, मयूर परब, ओंकार कावले, सचिन कावले हे सर्व निःस्वार्थ बलिदान मास पाळत आहेत. या सर्वांनी एक महिना पायात चप्पल न घालणे, चहा, गोड पदार्थ न खाणे, शुभ प्रसंग टाळणे असे नियम पाळत आहेत. तसेच दररोज संध्याकाळी ७.३० वाजता मठ-कावलेवाडी व माणिकचौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन दिवा लावून श्री संभाजीहृदय श्लोक म्हणत आहेत. 

फोटोओळी – बलिदान सुतकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर श्लोक म्हणत आहेत.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- गुरूकूल प्रज्ञा शोध परिक्षेत प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या पाच विद्यार्थ्यांनी राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर यश संपादन केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुले-पाळत-आहेत-धर्मविर-ब… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here