वेंगुर्ला प्रतिनिधी- आपल्या मातीशी इमान राखून, प्रामाणिक मेहनत घेणा-याला यशाची शिखरे नेहमी पादाक्रांत करता येतात. आईवडील व क्रीडा प्रशिक्षक गुरूंवर श्रद्धा आदर ठेवून, विद्यार्थी खेळाडूनी मेहनतीने यश मिळवून खेळाचे नाव उंचवावे, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शासकीय क्रीडा स्पर्धांचे शानदार उद्घाटनप्रसंगी केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-दूरदर्शन-रोबोकॉन-स्पर्ध/
अणसूर पाल येथे वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय क्रीडा स्पर्धां घेण्यात आल्या. उद्घाटन तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले. यावेळी अणसूर पाल विकास मंडळ मुंबई संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे, शालेय समिती चेअरमन एम.जी.मातोंडकर, सदस्य दिपक गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव योगेश फणसळकर, खजिनदार राजेश निर्गुण, वेंगुर्ला तालुका कॅरम असोसिएशनचे शंकर वजराटकर, स्पर्धा पुरस्कर्ते वेंगुर्ला मिडटाऊन रोटरी प्रेसिडेंट योगेश नाईक, उद्योजक अंकुश गावडे, आधार फाऊंडेशनचे नंदन वेंगुर्लेकर, माजी सहसचिव जयराम वायंगणकर, सहसचिव संजय परब, वेंगुर्ला तालुका मुख्याध्यापक संघ सेक्रेटरी किशोर सोन्सूरकर, वेंगुर्ला क्रीडा केंद्राचे संजीवनी चव्हाण, जयवंत चुडनाईक, अक्षता पेडणेकर, चारूता परब, मुख्याध्यापक व क्रीडा पशिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते तहसीलदार ओंकार ओतारी यांचा संस्थाध्यक्ष आत्माराम गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच वेंगुर्ल्यात क्रीडा विकासासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तालुका क्रीडा समितीचे माजी सहसचिव, क्रीडा शिक्षक जयराम वायंगणकर यांचा एम.जी.मातोंडकर यांच्या हस्ते तर वेंगुर्ला क्रीडा केंद्राच्या माध्यमातून, विद्यार्थी खेळाडू घडविण्यासाठी गेले अनेक वर्षे देत असलेल्या योगदानाबद्दल जयवंत चुडनाईक यांचा दिपक गावडे यांच्या हस्ते तर संजीवनी चव्हाण यांचा उद्योजक अंकुश गावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्यानंतर वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय कॅरम स्पर्धा १४,१७ व १९ वर्षांखालील वयोगटातील मुलगे व मुली या गटात खेळविण्यात आल्या. यामध्ये तालुक्यातील १५० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक राजेश घाटवळ, सूत्रसंचालन विजय ठाकर व आभार वेंगुर्ला तालुका क्रीडा समिती सहसचिव संजय परब यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी अणसूर पाल हायस्कूल, रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशन व वेंगुर्ला तालुका कॅरम असोसिएशन यांचे सहकार्य लाभले.
फोटोओळी – वेंगुर्ला तालुका शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन तहसिलदार ओंकार ओतारी यांच्या हस्ते झाले.