वेंगुर्ला प्रतिनिधी-बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या हस्ते ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाकडून ही स्वच्छता मोहिम राज्यभर विस्तारीत करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १७ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील म्हाडा वसाहत परिसरामध्ये ‘संपूर्ण स्वच्छता मोहिम‘ राबविण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नाना-शंकरशेट-यांच्यावर/
या स्वच्छता मोहिमेत प्लास्टिक कचरा, काचेच्या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल वर्गीकृत करून संकलित केला. ग्रासकटरच्या सहाय्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेले गवत, झाडी तसेच रस्ते झाडून स्वच्छ केले. तर गटारेसुद्धा साफ केली. परिसरातील अनधिकृत बॅनर, फलक व जाहिराती हटविण्यात आल्या. रस्ते धूळ मुक्त करण्यासाठी वॉटर टँकरच्या सहाय्याने रस्ते धुण्यात आले. नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढून त्यातील सांडपाण्याचा पुनर्वापर करून नाले साफ करण्यात आले.
या अभियानात नगरपरिषदेचया सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी, लोकप्रतिनिधी तुषार सापळे, उमेश येरम, डॉ.आर.एम.परब, सनि मोरे, म्हाडा सोसायटीचे जयसिग निर्गुण, हनिफ म्हाळुंगकर व बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेतला.
फोटोओळी — संपूर्ण स्वच्छता मोहिमेंतर्गत म्हाडा वसाहतीमध्ये स्वच्छता करण्यात आली.