Kokan: रत्नागिरीत इ. स. पूर्व ४० हजार वर्षांपूर्वीची सापडली दगडी हत्यारे

0
64
रत्नागिरीत इ. स. पूर्व ४० हजार वर्षांपूर्वीची सापडली दगडी हत्यारे
रत्नागिरीत इ. स. पूर्व ४० हजार वर्षांपूर्वीची सापडली दगडी हत्यारे

रत्नागिरी- कोकणात गेली दहा वर्ष कातळ खोदशिल्पांवर संशोधन सुरू आहे. पहिले कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्रही रत्नागिरीत सुरू झाले. केंद्राच्या माध्यमातून चालू असलेल्या संशोधनात्मक कामातून मालवण, राजापूर, रत्नागिरी या तालुक्यांमध्ये दगडी हत्यारे सापडली आहेत. मध्य-पुराश्म ते मध्याश्मयुग म्हणजेच साधारणपणे इसवी सन पूर्व ४० ते १० हजार या कालखंडातील ही हत्यारे असावीत. हा मानवाच्या अस्तित्वाचा महत्वाचा पुरावा आहे. ही सर्व हत्यारे सर्वसामान्यांना पाहण्यासाठी कोकणातील कातळखोद चित्र आणि वारसा संशोधन केंद्रात उपलब्ध आहेत.ttps://sindhudurgsamachar.in/kokan-आठ-दिवसात-वर्कऑर्डर-दिल्/

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पुढाकाराने आयआयटीएम प्रवर्तक, आयआयटी (मद्रास) आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्यातर्फे संचलित कोकणातील कातळशिल्प संशोधन हा राष्ट्रीय प्रकल्प सुरू आहे. अभ्यास, संशोधन करताना सापडलेली दगडी हत्यारे ही कोकणातील मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात खूप मोठी आणि महत्वपूर्ण आहेत तसेच दक्षिण कोकणात कातळशिल्प रचनांचा कालखंड निश्चित करण्यासाठी हे महत्वपूर्ण पुरावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here