Kokan: रत्नागिरी एमआयडीसीतील कंपनीकडून रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना?

0
70
fraud,
कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील एकाला घेतले ताब्यात

रत्नागिरी- स्वतःचा उद्योग उभारा, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आम्ही देतो, कच्चा माल देखील आम्हीच पुरवतो व तयार झालेले उत्पादन देखील आम्हीच खरेदी करतो असे आमिष दाखवत रत्नागिरीतील एमआयडीसी मधील एका कंपनीने अनेकांची रक्कम थकवल्याची घटना समोर आली आहे. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच अनेकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-व्हाट्सअँप-चं-म/

फसवणूक झालेल्यांमध्ये गरीब बेरोजगारांपासून राजकीय पुढाऱ्यांचा देखील समावेश आहे. मंगळवारी ग्रामीण पोलिसांनी या कंपनीत भेट दिल्याची देखील माहिती मिळत आहे. उद्योग उभारण्यासाठी आवश्यक सामग्री देतो असे सांगत अनेकांकडून लाखो रुपये घेऊन या कंपनीचे संचालक आता गायब झाल्याचे बोलले जात आहे. येथे उपस्थित असणारा कर्मचारी वर्ग येथे पैसे परत मागायला आलेल्यांच्या रोषाला बळी पडत आहे. या कंपनीचे तीनही संचालक सध्या फोन उचलत नाहीत. कंपनीतील कर्मचारी वर्गाच्या मागे लागल्यावर एखाद दुसऱ्याला केवळ पुढील तारखेचा चेक देण्यात येतो. मात्र असे देण्यात आलेले चेक देखील न वटल्याने अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here