Kokan: रत्नागिरी एमआयडीसीतील रुग्णालयातील गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई; डॉक्टर चौकशीसाठी ताब्यात

0
25
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत
रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि देवगड तालुका मुख्याध्यापक संघ आयोजीत "मोफत " "आरोग्य तपासणी शिबीर"

रत्नागिरी- शहरालगतच्या एका खाजगी दवाखान्यावर वैद्यकीय पथकाची धाड पडली असून या पथकाने त्या रुग्णालयात सुरू असलेल्या गर्भपात प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई आरोग्य पथक आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई होती. पोलिसांनी एमआयडीसी परिसरातल्या डॉक्टरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवापूर-ग्रामपंचायत-चा-अ/

याबाबत रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क केला असता त्त्यांनी चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई होईल असे सांगून या कारवाई बाबत दुजोरा दिला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून या घटनेने डॉक्टर पेशातील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. रत्नागिरीत सुरू असलेल्या या अशा प्रकारच्या प्रवृत्तीमुळे नक्कीच शहराच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here