Kokan: रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त

0
11
४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त
रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त

रत्नागिरी- सेंट्रल टीबी डिव्हीजन, यांच्या मार्गदर्शक सुचनानूसार महाराष्ट्रात २२५० ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतपैकी ४२ ग्रामपंचायती टी.बी. मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरविण्यात आल्या. तरी केंद्रीय स्तरावरुन प्राप्त पत्रातील मार्गदर्शक सुचनानुसार नमूद ग्रामपंचायतींना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते आज दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महात्मा गांधींच्या पुतळा स्मृतीचिन्हासह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राष्ट्रवादीचे-नेते-बाब/

यासोबत आरोग्याचे विविध कार्यक्रम व योजनांच्या माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या.याप्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार,मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी क्षयरोगा बद्दल सखोल माहिती देऊन गौरावपात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here