Kokan: रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालयांची २ कोटींची वीजबिल थकबाकी

0
92
रत्नागिरी नगर परिषद,
रत्नागिरी शहरातील शासकीय कार्यालयांची २ कोटींची वीजबिल थकबाकी

▪️ रत्नागिरी नगर परिषदचे ५७ लाख थकीत, पथदीप बिले थकली

▪️ सामान्य माणसाचे बिल थकले तर विद्युत प्रवाह खंडीत करणाऱ्या महावितरणचा दुजाभाव

▪️ भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक योगेश हळदवणेकर यांनी केली माहिती उघड

▪️ सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना त्रास द्याल तर हल्लाबोल करण्याचा दिला इशारा

रत्नागिरी- सामान्य माणसाचे वीजबिल थकले तर दोन महिन्यात विद्युतप्रवाह खंडित करणाऱ्या महावितरणने सामान्य माणसाला त्रास देऊ नये, अन्यथा हल्लाबोल आंदोलन करु, असा इशारा भाजप पंचायतराज व ग्रामविकास विभाग रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा संयोजक योगेश हळदवणेकर यांनी दिला आहे. हळदवणेकर यांनी माहिती अधिकारात महावितरण कसा दुजाभाव करते, याची पोलखोल केली. शहरातील शासकीय कार्यालयांची २ कोटींची वीजबिले थकीत असताना अदयाप त्यावर कार्यवाही केली जात नाही आणि सामान्य माणसांचे वीजबिल थकले तर कनेक्शन कट करण्यात येते, हा दुजाभाव हळदवणेकर यांनी दाखवून दिला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिक्षक-भरती-उमेदवारांन/

याबाबत अधिक माहिती देताना हळदवणेकर म्हणाले, रत्नागिरी शहरांत पथदीप लावण्यात आले. त्यावर अनावश्यक खर्च करुन रंगीत लाईट लावून गाजावाजा करण्यात आला. त्याचे बिल सुमारे ५७ लाख अद्याप थकीत आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे रोजी आणि प्रासंगिक वेळी ही रंगीत लाईट लावून शोभा वाढवावी, परंतु वीज बिले थकीत ठेवून रत्नागिरीकरांच्या खिशातून पैशाचा अपव्यय करण्यात काय धन्यता आहे? असा सवाल हळदवणेकर यांनी केला आहे.

याशिवाय महिला हॉस्पिटलचे २९ लाखांचे थकीत बिल आहे. नाचणे ग्रामपंचायतिचे २९ लाखाचे बिल थकीत आहे. एस पी कार्यालय आणि जेलचे ९ लाख थकीत आहेत. असे अनेक शासकीय कार्यालयांची वीजबिले थकीत असताना यावर शांतता पाळणारे महावितरण सामान्य माणसाचे बिल थकले तर कनेक्शन तोडते. हे कनेक्शन न तोडता सामान्य माणसाला पण सवलत द्यावी, अशी मागणी योगेश हळदवणेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here