सिंधुदुर्ग- रत्नागिरी सिंधुदुर्ग 46 लोकसभा मतदारसंघात एकूण 1940 मतदान केंद्रे आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाचा यात समावेश असून या निवडणुकीसाठी 14 लाख 38 हजार 471 एकूण मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-लोकसभेसाठी-शिवसेना-उद्ध/
यावेळी प्रथमच 85 वर्षे वरील मतदारांना घरी राहूनच पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या लोकसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व सिंधुदुर्ग चे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवरील पत्रकार परिषदेत दिली.