कणकवली- :भाजप ची 13 वी यादी जाहीर झाली आहे.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर जाहीर केली आहे.
गेले खूप दिवस रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण उमेदवार राहणारे याबाबत उलट सुलट चर्चा होत होत्या त्याला पूर्ण विराम मिळाला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-केळूस-ते-आंदुर्ले-पिंपळ-म/
सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून भाजप नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्याचे निश्चिच झाले आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा उमेदवारांची १३ वी यादी घोषित केली असून त्यामध्ये रत्नागिरीमधून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तत्पुर्वी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत किरण सामंत यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे नारायण राणे यांना उमेदवारी देताना शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत यांना भविष्यात विधानपरिषदेवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले आणि त्याच वेळी भविष्यात किरण सामंत यांना कोणत्याही परिस्थितीत न्याय दिला जाईल, असे सांगितले. किरण सामंत यांना राज्यात विधानपरिषदेवर किंवा राजधानी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान दिले जाईल, असा समझोता झाल्याचे समजते.
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांना अभुतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे मत माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे. रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना माजी खासदार निलेश राणे यांनी आमदार वैभव यांच्या वर सडकून टीका केली आणि महायुतीचा उमेदवार लवकरच उमेदवारी दाखल करेल असे सांगितले.