Kokan: ‘रस्ता बंद‘ मुळे पर्यटनाला फटका ः कोंडुरा येथील घटना

2
26
कोंडुरा समुद्र किनारा ,
‘रस्ता बंद‘ मुळे पर्यटनाला फटका ः कोंडुरा येथील घटना

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध कोंडुरा समुद्र किना-यावर जाणारा रस्ता बंद करून ‘रस्ता बंद‘चा फलक लावल्याने पर्यटक तेथील निसर्ग सौंदर्याच्या आस्वादाला मुकले आहेत. सिधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मालकीचा हा रस्ता तेथील जमिनदारांनीच बंद केला असल्याने याचा फटका पर्यटनाला बसला आहे. hhttps://sindhudurgsamachar.in/ड्रीम-११-कप-१४-वर्षाखाल/

      कोंडुरा समुद्र किनारा हा नवनवीन पर्यटकांना भुरळ घालतोय. मात्र हा समुद्र किनारा आता एका वेगळ्याच विषयाने चर्चेत आला आहे. या समुद्रकिनारी येण्यासाठी पर्यटकांना मात्र सध्या अडथळा होत आहे. या किना-यावर जाणा-या डांबरी रस्त्यावर तारेने कुंपण करून मोठमोठे दगड ठेवण्यात आले आहेत. तर याठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले आहेत. या सूचना फलकावर लिहिण्यात आले आहे कीकोंडूरावाडी ग्रामस्थ आणि कोंडूरा समुद्र किनारी येणा-या पर्यटकांच्या सोईसाठी चार वर्षापूर्वी कोंडुरा येरम लिंग देवालय ग्रा.मा.६० रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंर्तगत मंजूर झाले. परंतू कि.मी. १/९०० मध्ये दोन व्यक्तिनी अतिक्रमण करून अडथळा उभारल्यामुळे रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. सदर अडथळा हटवून रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी आम्ही ग्रामस्थांनी जिल्हा मुख्यालयसिंधुदुर्ग येथे १५ ऑगस्ट २०२३२६ जानेवारी २०२४ आणि १८ मार्च २०२४ रोजी उपोषणे केली अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांनी १८ मार्च २०२४ रोजी या रस्त्यावरील अडथळा १० दिवसात हटविण्याबाबत जि. प. बांधकाम विभागास आदेश केला. तरीही आजपर्यंत अडथळा हटविण्यात आला नाही. या रस्त्याखालील जमीनी आम्ही संमत्ती व बक्षिस पत्राने जि. प. सिंधुदुर्गला दिलेल्या होत्या व त्या जमिनींची आवश्यकता जि. प. सिंधुदुर्गला नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे सदर रस्त्याच्या कि.मी. १/९०० मधील अडथळा हटविण्यात येईपर्यंत आम्ही आमच्या मालकीच्या जमीनीतून जाणारा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होणा-या गैरसोईबाबत आम्ही दिलगीर आहोत. असा सूचना फलक याठिकाणी जमीनदार व ग्रामस्थ यांनी लिहिला आहे.

   हा रस्ता बंद केल्याने याठिकाणी येणा-या पर्यटकांना सुमारे १ ते दीड किलोमीटर वर गाड्या ठेऊन समुद्र किनारी चालत जावे लागत आहे. तसेच या रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी खर्च करण्यात आला आहे. यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता मोकळा करण्याची मागणी पर्यटकांतून होत आहे.

फोटोओळी – कोंडुरा समुद्र किनारी जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.

2 COMMENTS

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- निवती येथे ३० मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आंबा काजू बागेला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाद्वारे वेळीच आग विझविण्यात आली. त्यामुळे अनर्थ टळला.https://sindhudurgsamachar.in/kokan-रस्ता-बंद-मुळे-पर्यटन/ […]

  2. […] मुंबई: सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा सुप्रसिद्ध गायक, सूत्र संचालक व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे. येत्या रविवार दिनांक २ जून रोजी संध्याकाळी ७ :०० वाजता, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होईल. https://sindhudurgsamachar.in/kokan-रस्ता-बंद-मुळे-पर्यटन/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here