शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांची आमदार डॉ.राजन साळवीच्या पाठीवर कौतुकाची थाप
राजापूर/प्रतिनिधी दि.२०: राजापूर,लांजा व साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेना [उध्दव बाळासाहेब ठाकरे] उपनेते आ.राजन साळवींच्या नेतृत्वाखाली अपेक्षेप्रमाणे दणदणीत यश मिळाले असुन याचपार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे यांनी आमदार डॉ.राजन साळवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राजापूर विधानसभा मतदार संघातील एकून ५३ ग्रामपंचायतीपैकी ३५ ग्रामपंचायतीवर भगवा फडकवित आपले वर्चस्व कायम राखले तर उर्वरीत १८ ठिकाणी गाव पॅनल ,कॉंग्रेस ,राष्ट्रवादी व भाजपने आपल्या जागा जिंकल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-लांजा-तालुक्यातील-१९-ग्र/
लोकसभा,विधानसभा,पं.स.व जि.प.च्या प्रत्येक निवडणूकीत या २६७-राजापूर विधानपानेला सभा मतदारसंघात शिवसेनेने सातत्याने आपले वर्चस्व सिध्द करीत हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे सिध्द केले आहे. दरम्यानच्या झालेल्या ग्रा.पं.च्या निवडणूकीप्रमाणे या वेळीही शिवसेनेने गाव पॅनलसहित इतर सर्व विरोधकांना स्वतःच्या जवळपासही फिरकू न दिल्याचे चित्र ग्रामपंचायतीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-भाजपच्या-ताब्यात-असलेल/
राजापूर तालुक्यात एकुण ३१ ग्रा.पं.साठी मतदान झाले होते व याठिकाणी शिवसेना[उध्दव बाळासाहेब ठाकरे] १७, भाजप ३,गाव पॅनल ४,कॉंग्रेस ३,मनसे १,राष्ट्रवादी १ व शिंदे गट २ विजय मिळवला आहे. लांजा तालुक्यामध्ये तर शिवसेना [उध्दव बाळासाहेब ठाकरे] पक्षाने विरोधकांना चांगलाच शह देउŠन करताना एकुण १९ ग्रा.पं.पैकी १५ ठिकाणी शिवसेनेचे पॅनल बसवले व २ ठिकाणी गाव पùनेल तर २ ठिकाणी भाजपा विजयी झाले आहे. यावेळी लांजा तालुक्यात शिवसेनेला दोन नवीन ग्रा.पं.वर आपले वर्चस्व सिध्द करण्याची संधी मिळाली. तर दाभोळे (साखरपा) जि.प.गटात ३ ग्रा.पं.पैकी ३ ठिकाणी शिवसेना विजयी झाली असुन शिवसेना [उध्दव बाळासाहेब ठाकरे] पक्षाचे वर्चस्व सिध्द केले आहे.