Kokan: राज्यघटनेमुळेच महिला व शोषितांना सन्मानाचे जगणे – अॅड.सुषमा प्रभूखानोलकर

0
41
aambedkar-jaynti
राज्यघटनेमुळेच महिला व शोषितांना सन्मानाचे जगणे - अॅड.सुषमा प्रभूखानोलकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- डॉ.आंबेडकर हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत. त्यांनी देशाला दिलेली लोकशाही जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना म्हणून गणली गेली आहे. त्यांच्यामुळेच आज महिला व शोषित घटकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांनी केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-गवताच्या-गंजीला-आग-सुदैव/

 वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानीतर्फे ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली विठ्ठल मंदिरात १४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. डॉ.आंबेडकर ज्या समाजात जन्माला आले तो काळ फार कठीण होता. त्यांनी अनेक अपमान सहन करून प्रस्तापितांच्या विरोधाला धैर्याने सामोरे जात शिक्षणाचे व्रत अंगिकारले. ज्ञान आणि बुद्धिच्या जीवावर ते देशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचले. महर्षी व्यासानंतर सर्वज्ञ ज्ञानी म्हणून केवळ डॉ.आंबेडकरांकडेच पहात येईल. आपल्या समाजाच्या उद्धारासाठीच त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला असल्याचे अजित राऊळ यांनी सांगितले.

यावेळी विजय मोरजकर, दिना आचार्य, संतोष परब, जयराम वायंगणकर, कैवल्य पवार, धनंजय गोळम, बाबूराव खवणेकर, आपा धोंड, गुरूप्रसाद खानोलकर, ओजस पाडगांवकर, भूषण खवणेकर, किशोर नरसुले, सर्वेश शिरसाट, रवी शिरसाट, सुहास गवंडळकर, वृंदा गवंडळकर, बाळू देसाई, बाबली वायंगणकर, हसिनाबेगम मकानदार, अभि वेंगुर्लेकर, प्रणव वायंगणकर, इशा मोंडकर, श्रेया मयेकर, रसिका मठकर, शिवराम आरोलकर आदी उपस्थित होते.

फोटोओळी – हिदू धर्माभिमानीतर्फे आयोजित केलेल्या डॉ.आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here