केळुस – कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त आज गुढीपाडव्या दिवशी श्री विठ्ठल रखुमाईची भव्य दिव्य अशी मुर्ती सजविण्यात आली आहे. तर रामनवमी उत्सवानिमित्त श्री.विठ्ठल रखुमाई मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.या विद्युत रोषणाई हे मंदिर फुलून दिसत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सोलापूरात-भाजपचे-राम-सा/
वेंगुर्ले तालुक्यातील केळुस – कालवीबंदर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून म्हणजेच आज मंगळवार दि.९ एप्रिलपासून ते बुधवार दि.१७ एप्रिल २०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय सामाजिक नाट्य स्पर्धांचे आयोजन येथील नवतरुण उत्साही कला,क्रिडा मंडळ व श्री विठ्ठल रखुमाई उत्सव कमिटी व ग्रामस्थ कालवीबंदर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आज मंगळवार दि.९ एप्रिल २०२३ रोजी रात्री ९ -३० वाजता सामाजिक नाट्य स्पर्धेचे उद्घाटन (मान्यवरांच्या उपस्थितीत), रात्री १० वाजता श्रींची इच्छा कलामंच नाट्यमंडळ तेंडोली यांचे सामाजिक नाटक “देव नाही देव्हाऱ्यात”