वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात १० ते १५ जानेवारीपर्यंत माघी गणेश जयंती उत्सव व परिवार देवतांचे वर्धापनदिन उत्सव साजरे होणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-जिल्ह्यात-पा/
दि.१० रोजी उत्सवास प्रारंभ, श्री रामेश्वर, नागेश्वर, शनी या देवांवर लघुरुद्र व अभिषेक, दि.११ रोजी शनिदेव वर्धापनदिन, श्रीसत्यनारायणाची महापूजा, दि. १२ रोजी श्री नागेश्वर वर्धापनदिन, वरदशंकर व्रतपूजा, नवचंडी देवता स्थापना व पाठवाचन, दि.१३ रोजी श्री गणेश जयंती (अंगारक योग), २१ गणपतींची स्थापना व २१ गणेशयाग (हवन) पूर्णाहूतीसह, सायं.४ पासून हळदीकुंकू, दि.१४ रोजी श्री भगवती वर्धापनदिन, नवचंडी हवनयुक्त, स.१० पासून कुंकूमार्चन, नवचंडी हवनाची पूर्णाहूती, सायं.५ वा.गणपती विसर्जन, दि.१५ रोजी १२ वा.बारापाच देवतांस महानैवेद्य, आरती, गाहाणे व सर्व लोकांस महाप्रसाद. उत्सव कालावधीत रात्रौ.७ वा. तरंगदेवता व गणपती-भगवती, नागनाथ-दत्त यांची भजनासहीत पालखी प्रदक्षिणा. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा, कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे केले आहे.