मुंबई- कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. पुढील २४ तासांत मुंबईत बहुतेक ठिकाणी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर तुरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यांत पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे या भागामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकतं. तर मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. १९ जुलै साठी साताऱ्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पुण्याला २ दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-रत्नसिंधू-योजनेचा-धनदां/
उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरलाही १९ जुलैसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट हवामान विभागाने दिला नाही आहे. मराठवाड्यातील पूर्वेकडील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक असणार आहे. तर गडचिरोली भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.