⭐सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधणार-अर्चना घारे
⭐दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा
सावंतवाडी ता. २५ : सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे २७ रोजी जिल्ह्यात दाखल होत आहेत यानिमित्ताने त्यांचा दोडामार्ग येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून येथील सावंतवाडी टर्मिनस, आडाळी एमआयडीसी, हत्ती प्रश्न, रोजगार आणि पर्यटन आदी विषयावर लक्ष वेधण्यात येणार असून दोडामार्ग, बांदा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे यांनी आज येथे दिली.https://sindhudurgsamachar.in/kokan-राष्ट्रवादी-काँग्रेसच्-2/
तर दोडामार्ग येथे सभा झाल्यानंतर सौ. सुळे या सावंतवाडीत येऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकान्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. घारे यांनी केले.