डॉ विशाल कडणे यांचा उपक्रम, स्पर्ध्येमध्ये १७२५ शिक्षक स्पर्धकांचा समावेश
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l तळेरे l निकेत पावसकर दि. 13 :
स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शिक्षक चळवळीतील युवा कार्यकर्ते आणि तळेरे (जिल्हा सिंधुदुर्ग) गावचे सुपुत्र डॉ. विशाल कडणे यांच्या हेल्पिंग हँड फाऊंडेशनतर्फे (Helping Hand Foundation -NGO) मुंबईसह राज्यातील शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांसाठी विशेष प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १७२५ स्पर्धकांनी सक्रिय सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मोबाईल-साठी-मुलाची-आत्म/
१२ जानेवारी ‘राष्ट्रीय युवा दिन’ या संकल्पनेवर आधारित ह्या प्रश्नमंजूषा स्पर्ध्येमध्ये युवा दिनाबाबत ३० प्रश्न समाविष्ट होते. स्वामी विवेकानंद यांचा जीवन प्रवास, रामकृष्ण मिशन, शासनाच्या युवांच्या बाबतीतील विविध योजना अशा अनेक बाबींनी परिपूर्ण अशी हि प्रश्नमंजुषा असल्याचे आयोजक डॉ. विशाल कडणे यांनी सांगितले. युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद यांचा जीवनप्रवास सहभागी शिक्षकांच्या पुढ्यात पुनःश्च उलगडला गेला, असे आयोजक डॉ. विशाल कडणे यांनी सांगितले. प्रत्येक सहभागी स्पर्धकास राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र दिले गेले. प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संपादक किरण शेलार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तेजस परब, रवींद्र जाधव, राजेंद्र थेराडे, अंकित तोरणे, जयवंत मालणकर, शिरीष देवरुखकर, सुखदा कडणे, अनिल मुंढे, डॉ. चंद्रशेखर भारती यांनी आयोजन समितीस प्रभावशाली मदत केली.
युवा दिनाच्या निमित्ताने अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचता आल्याचे समाधान आयोजक डॉ. विशाल कडणे यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया :
स्वामी विवेकानंद म्हणजे विवेक आणि आनंद, आणि विशाल म्हणजे विशाल व विचार यांचे मिश्रण. युवा दिवस हा समाजाच्या विकासाला आकार देण्याचा आणि उमेद वाढविण्याचा प्रेरणादायी दिवस, स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्यात महानता आहे ह्या विचारसरणीचा प्रचार करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवन प्रवासावर डॉ विशाल कडणे आयोजित प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याचा आनंद प्रेरणादायी होता,
प्रमोद वसंत महाडिक, सहभागी शिक्षक
प्रतिक्रिया क्र. २ –
नव वर्षाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या जीवनप्रवासाचा अभ्यास ह्या प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने झाला. हे वाचन संपूर्ण वर्षासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. १७०० हुन अधिक शिक्षकांना एकाच ऑनलाईन व्यासपीठावर एकत्र आणल्याबाबत आयोजक डॉ विशाल कडणे यांचे मनपूर्वक कौतुक आणि अभिनंदन.
श्री. राजेंद्र थेराडे, सहभागी शिक्षक